फ्लू बाई फ्लू स्वाईन फ्लू तोंडाला मास्क लावरे गोविंदा तू, रे गोविंदा तू
बंटी म्हणतो बबलीला कीस दे मला झकास बंटी म्हणतो बबलीला कीस दे मला झकास बबली म्हणे बंटीला लाव तोंडाला मास्क, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू
अभ्यासाला बस म्हणत बाप आला तोऱ्यात अभ्यासाला बस म्हणत बाप आला तोऱ्यात पोरगं म्हणतय गप बस, नाय तर शीकंल मी जोरात, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू
सकू आली बाब्यासाठी करून नट्टा पट्टा सकू आली बाब्यासाठी करून नट्टा पट्टा बाब्या होता आजारी, आणि रिकामा रोजचा कट्टा, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू
गणपत गेला सकाळी सकाळी घेऊन पाण्याच दबडं गणपत गेला सकाळी सकाळी घेऊन पाण्याच दबडं थुकायला गेला तर तोंडाला मास्क, भरलं त्याच थोबडं, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू
सासू म्हणे सुनेला बाईगं झाली मला सर्दी सासू म्हणे सुनेला बाईगं झाली मला सर्दी सून म्हणे, लागली एकदाची स्वाईन फ्लूची वर्दी, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू
नवरा म्हणे बायकोला कागं झाली नाराज नवरा म्हणे बायकोला कागं झाली नाराज बायको म्हणे शिऊ नका फ्लू आहे आज, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू.
फ्लू बाई फ्लू स्वाईन फ्लू तोंडाला मास्क लावरे गोविंदा तू, रे गोविंदा तू
माझी कविता लिहायची इच्छा खूप दिवसा पासून होती. पण यमक आणि कल्पना जुळवताच येत नसत. मी काही कडवी तयार करायचो पण अर्धवट. हा कवितेचा छंद मला परत अचानक लागला म्हटले तरी चालेल. माझा मुंबईचा जॉब सोडताना मी सगळ्यांना 'bye bye' मैल लिहिला. आणि त्यात मी काही कडवी रचली. आणि ती हि अचानक सुचली ५ ते ६ मिनटात. आणि त्या नंतर मी कविता करू शकतो हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. 'माझी छावी' हि माझी पहिली कविता. काही कविता फक्त मनात होत्या त्या तशाच विरून जाऊ नये म्हणून सोमरस (http://sites.google.com/site/somrasatun/)हि site तयार केली