Wednesday, July 22, 2009

श्रावण आरंभ

आला आला पाऊस, चिंब भिजले अंग

श्रावणहि उधळत होता, नवे नवे रंग

दिसलास तू नाचताना, अन न्यारे तुझे ढंग

मनोहर ते रूप तुझे, पाहून झाले दंग

वाटलास तू सखा हरी, तूची श्रीरंग

करावी तुझीच पूजा, गावे तुझे अभंग

होणार मी फक्त तुझी, केला मनाशी चंग

घसरला पाय माझा, घडले पडायचे सोंग

सावरलेस तुही मला, न लावता विलंब

अडकले तुझ्या बाहुपाशात, अन उठले तरंग

विषारी ती नजर तुझी, न होवो भुजंग

कोवळी माझी काया, कपडेही झाले तंग

थांबला तो क्षण तेथेच, होऊनी अपंग

टेकवावेस ओठ तुझे, अन शहारावे अंग अंग

तर एवढ्यातच झाले हे, स्वप्न माझे भंग

पण नजर तुजी होती माझ्याकडेच, भिजले त्यात चिंब

अन घसरला आता पाय खरेच, झाले स्वप्न आरंभ

सोमनाथ ठाकरे