Monday, August 31, 2009

टाळ (विडंबन)

दिवस दुष्काळी सुरूच राहिले

चारा नाही बैल कोमेजले

शेतकरी मन खिन्न जाहले

ठण ठण गोपाळ, ठण ठण गोपाळ

टाळ वाजे जोरात

शेतकऱ्यांची हि अजब कहाणी

घरात नाही दाणा पाणी

अजूनही पावेना वर्षाराणी

ठण ठण गोपाळ, ठण ठण गोपाळ

टाळ वाजे जोरात

दिवसभर तो वण वण फिरला

बँकेतहि तो सगळ्याच मिरला

कर्जाचा डोंगर वाढतच राहिला

रात्रभर ना डोळ्याला डोळा

टाळ वाजे डोक्यात

येणार नाही आता पावसाळा

देऊ काय मी माझ्या पोराबाळा

लाऊन घेतो हा फास मी गळा

माफ करेल मला माझा विठू सावळा

टाळ सहावेना आजीबात

बळीराजाने स्वतःचेच बळी घेतले

पाठोपाठ सारे जन-रान पेटले

शेवटी शेतकरी कर्जमुक्त जाहले

विठूची हि कृपाच न्यारी, छप्पर फाटले

चला टाळ वाजवूया जोरात

पावसाचीही आता कृपा जाहली

दुष्काळलेली जमीन सुखात नाहली

आनंदाला कुणाच्या सीमा उरली

झटका मरगळ, ठेवा टाळ खाली

चला जाऊया शेतात, चला जाऊया शेतात

- सोमनाथ ठाकरे (पुणे)

४ फ्लू बाई फ्लू स्वाईन फ्लू

फ्लू बाई फ्लू स्वाईन फ्लू
तोंडाला मास्क लावरे गोविंदा तू, रे गोविंदा तू

बंटी म्हणतो बबलीला कीस दे मला झकास
बंटी म्हणतो बबलीला कीस दे मला झकास
बबली म्हणे बंटीला लाव तोंडाला मास्क, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू

अभ्यासाला बस म्हणत बाप आला तोऱ्यात
अभ्यासाला बस म्हणत बाप आला तोऱ्यात
पोरगं म्हणतय गप बस, नाय तर शीकंल मी जोरात, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू

सकू आली बाब्यासाठी करून नट्टा पट्टा
सकू आली बाब्यासाठी करून नट्टा पट्टा
बाब्या होता आजारी, आणि रिकामा रोजचा कट्टा, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू

गणपत गेला सकाळी सकाळी घेऊन पाण्याच दबडं
गणपत गेला सकाळी सकाळी घेऊन पाण्याच दबडं
थुकायला गेला तर तोंडाला मास्क, भरलं त्याच थोबडं, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू

सासू म्हणे सुनेला बाईगं झाली मला सर्दी
सासू म्हणे सुनेला बाईगं झाली मला सर्दी
सून म्हणे, लागली एकदाची स्वाईन फ्लूची वर्दी, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू

नवरा म्हणे बायकोला कागं झाली नाराज
नवरा म्हणे बायकोला कागं झाली नाराज
बायको म्हणे शिऊ नका फ्लू आहे आज, आता फ्लू बाई फ्लू.................रे गोविंदा तू.

फ्लू बाई फ्लू स्वाईन फ्लू
तोंडाला मास्क लावरे गोविंदा तू, रे गोविंदा तू


सोमनाथ ठाकरे

मी 'सोमनाथ ठाकरे' बोलतोय

'सोमनाथ' तू गेलाय कामातून
'ठाकरे' काढून टाक नावातून
पोकळ झालायेस तनामनातून
हवा राहिलीये फक्त दाटून
नशीब गेलय फाटून
झालायेस आता कार्टून
आतल्या जखमा दाखवणार कुठून
तर व्यक्त होतायेत त्या कवी मनातून

सोमनाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽथ जागा हो

अरे जन्म घेतलायेस शिवाजीच्या मातीतून
सुख दुखं काय येतंच राहतील एका पाठून
पण तूच खचलास मनातून
तर अपेक्षा करायच्या कुणाकडून
बगत रहावस वाटतं तुझ्याकडे हसून
जखमा ठिव झाकून
मोकळा कर श्वास उरातून
तरच वाचशील या मंदीच्या पुरातून
आत्मविश्वास ठेव फक्त दाटून
मराठ्यांचं रक्त आहेच नसानसातून
वाट बघ कितीही नशीब जात नाही कधी कुणाला चाटून
ते बनवावं लागतं स्वताच्या कष्टातून
जसं उभं केलं स्वराज्य महाराजांनी शून्यातून
वेळ गेलेली नसतेच कधी कुणाच्या हातातून
जिद्द असेल मनातून, तर सोनं पिकतच कि मातीतून
काम केलय मी घोड्याला पाण्यापाशी सोडून
आता तूच ठरवायचं पाणी पियाचं
कि किडे निवडायचे पाण्यातून
कि परत म्हणायचं 'सोमनाथ' गेलाय कामातून