Wednesday, July 22, 2009

श्रावण आरंभ

आला आला पाऊस, चिंब भिजले अंग

श्रावणहि उधळत होता, नवे नवे रंग

दिसलास तू नाचताना, अन न्यारे तुझे ढंग

मनोहर ते रूप तुझे, पाहून झाले दंग

वाटलास तू सखा हरी, तूची श्रीरंग

करावी तुझीच पूजा, गावे तुझे अभंग

होणार मी फक्त तुझी, केला मनाशी चंग

घसरला पाय माझा, घडले पडायचे सोंग

सावरलेस तुही मला, न लावता विलंब

अडकले तुझ्या बाहुपाशात, अन उठले तरंग

विषारी ती नजर तुझी, न होवो भुजंग

कोवळी माझी काया, कपडेही झाले तंग

थांबला तो क्षण तेथेच, होऊनी अपंग

टेकवावेस ओठ तुझे, अन शहारावे अंग अंग

तर एवढ्यातच झाले हे, स्वप्न माझे भंग

पण नजर तुजी होती माझ्याकडेच, भिजले त्यात चिंब

अन घसरला आता पाय खरेच, झाले स्वप्न आरंभ

सोमनाथ ठाकरे



1 comment:

सोमनाथ ठाकरे said...

मुळ SMS आणि sequence खालील प्रमाणे, त्याचा स्वैर अणुवाद आणि वरील कवितेत आणि कल्पनेत रूपांतर माझे आहे
आला आला पाउस, चिंब भिजले आंगन
घसरले तुझे पाय, आणि सुजले तुजे ढुं............ अनामिक चावट कवी

मित्रानो मी मुळ कथा तीच ठेउन कल्पना थोडी बदलली आहे.
तिचा पाय ती घसरवुन मुद्दामून पड़ते. केवळ त्याचे लक्ष जावे म्हणुन पड़ते, असे मी दाखवले आहे.
आणि ते ही तिचे स्वप्न असते जे शेवटी खरे होते.
खरेतर कविता करायला मला वेळ नाही. पण ही कविता मी मुंबईला येताना बस मधे अडीच तासात बनवली.
तेहि मोबाइल वर मुळ एस एम एस ला एडिट करून. ती कविता आशी होइल असे मला वाटले नव्हते. कारण अंग वरुण मला बरेच एमक सुचले होते जसे अभंग, भुजंग, अपंग. पण ते वापरायचे कसे आणि कुठे, ज्याचा पाहिले तर तसा कवितेशी काहीही संभंध (अजुन एक एमक भेटला-संभंध) नाही.
तर तिथे माजा जास्त कस लागला आणि वेळही लागला. पण कविता तयार झाल्यावर माझाही विश्वास बसत नव्हता की ही कविता आपण तयार केलि आहे.
सोमनाथ ठाकरे