Saturday, July 18, 2009

माझी छावी (माझी पहिली कविता)

माझी छावी

मी कवी तर नक्कीच नाही

पण तुला पाहिले आणि जागा झालाय माझ्यातला कवी

वाटतेस तू मला नेहमी हवी हवी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


तुला पाहिले अन जगलो सगळ, मिळाल सर्व काही

तुझ्या शिवाय आता आठवत नाही बाकीच काही

आहे माझ जे काही करतो सगळ तुझ्या नावी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी




किती दिवस एकटे भटकनार आता वाटते मलाही

माझ्या सोबत आता तुही फिरावी

मी बाईकवर पुढे बसणार, तू मागे बसावी

करावा रोमांस गाणी प्रेमाची गावी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


विचारत असतात बाबा विचारत असते आई

आजकाल तुझ लक्ष कुठे असतं तुला गोष्ट कोणती हवी

काय सांगू त्यांना, मिळालीय गोष्ट जी हवी

जी कुठेच लक्ष लागु देत नाही, ती तुमची सुन आहे भावी

तिचा चेहरा जीवाला वेड लावी


असशील जरी तू सुंदर, अपेक्षा नसाव्यात तुझ्या अवाजवी

जरी नसेल माझ्याकडे बंगला तरी माझ्या हृदयात तू रहावी

कष्टाने मिळवलेली भाकर तू आनंदाने खावी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


गोष्ट तशी हि जुनीच गोष्ट नाही नवी

मागच्या जन्मीचे आपण चंद्र आणि रवी

जन्मोजन्मीची साथ आपली जन्मोजन्मी दृढ होत जावी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


तू माझ्या मनमंदिरात नेहमी अशीच तळपत रहावी

दुष्काळलेली जमीन जशी पावसाने भिजावी

जशी समुद्राची लाट त्याला कधीच सोडत नसावी

कारण मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी



कस सुचलं हे सगळं मला, माझ मलाच समजत नाही

मला वाटत तू माझा देव आहे तूच मला वाट दावी

बाकी विशेष अस काही नाही, मी आपला नाममात्र कवी

मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


आशा करतो मी तुम्हाला बोर झाले नसावे

बस करतो छावी पुराण, कारण तुम्हाला दुसरेही काम असावे

पण आठवेल तुम्हाला हेच पुराण जेव्हा तुम्ही प्रेमात पडावे

आणि मग तुम्हीही तिला म्हणावे

मी तुझा छावा तू माझी छावी

तुझा चेहरा जीवाला वेड लावी


सोमनाथ ठाकरे







No comments: